मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांनी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास अभिनंदन केले. आदित्यनाथ यांनी राज्यातील शेतक-यांचा विचार करुन कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा दिलाय. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानीही असाच निर्णय घेऊन कर्जमाफीची घोषणा करावी असंही उद्धव यांनी म्हटलय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान केंद्र सरकारने यूपीमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं आहे, पण महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे काही कोटींचे कर्ज माफ करत नसून, केंद्र सरकार महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देत असल्याची टीका अजित पवार आणि विखे पाटील यांनी केली आहे.