मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख यांची आज गिरगाव चौपाटीवर सभा पार पडली. यावेळी, भाजपला त्यांच्याच भाषेत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा अध्यक्ष म्हणाले ही तर 'फ्रेंडली मॅच'...पण, कौरव-पांडव फ्रेंडली मॅच कशी होईल? असा प्रश्न विचारत त्यांनी अमित शहांना टार्गेट केलं. 'ही फ्रेंडली मॅच नाही तर अस्मितेची लढाई' असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर निवडणुकला 'महाभारत' म्हणणाऱ्या आशिष शेलारांना 'लिंबू-टिंबू' संबोधत उद्धव ठाकरेंनी त्यांचाही समाचार घेतला. 



'ही प्रचाराची नाही, विजयाची सभा'


- आजपासून लोकशाहीच्या लढाईला सुरुवात झाली


- यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात फ्रेंडली मॅच आहे आणि इकडचे लिंबू-टिंबू महाभारत म्हणतायत.


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना धन्यवाद... तुम्ही आमच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवलीत, कारण जो शिवसेनेला विरोध करतो तो यापुढे राजकारणात दिसत नाही.


- यांच्या पारदर्शकतेचा बुरखा केंद्रातल्या आर्थिक पाहणी अहवालाने टरा टरा फाडला


- या पारदर्शक अहवालामुळे यांचीच बोबडी वळली, आधीच बोबडी त्यात बोबडी वळली... याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःचे दात घशात घालणे


- कामाचं श्रेय तुम्हाला देतो, पण फुकट श्रेय दिलं तरी घ्यायची लायकी पाहिजे


- लोकसभा ते ग्रामपंचायत सगळीकडे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान फिरतायत, कारभाराकडे लक्ष कुठेय?


- मोदी बाजार उद्यान समितीचे अध्यक्षदेखील होऊ शकतील


- काँग्रेसच्या होर्डिंग्जवर खड्डे, जिथे जायचंय तेच दिसणार... यांना खड्ड्यातचं जायचंय...


- अख्खा देश यांनी खड्ड्यात घातला आता देशवासियांना यांना खड्ड्यात घातलं


- एकदा भूल केलीत, दोबारा भूल की तो सुधार नही सकोगे 


- मुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन होणारच, एवढी घाई कसली परिवर्तनाची, अजून दोन वर्षे बाकी आहेत


- एवढीच घाई असेल परिवर्तनाची तर घेऊन टाका पुन्हा सर्व निवडणुका 


- दादर ते ठाणे रेल्वे इंग्रजांनी बांधली तरी घालवला ना त्यांना... मग मेट्रो बांधून तुम्ही काय उपकार करताय


- जाहिरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवताय, म्हणजे यांना मुंबई अजून कळलेलीच नाही... आमचा जन्म मुंबईत होऊन 50 वर्ष झाली


-  यांचा इंटरनॅशनल पक्ष, मंगळावरून आणि शनिवरसुद्धा यांचे सदस्य असतील. कारण परगृहावरुनही यांना मिस्ड कॉल येऊ शकतो 


- उत्तरप्रदेशचा जाहीरनाम्यात म्हटलय की जर उत्तरप्रदेशात भाजप सरकार आलं तर पीक कर्ज माफ केलं जाईल... तिथे तर सरकार यायचंय... मग महाराष्ट्रात तर सरकार आहे, इथे का शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करत नाही


- कल्याण डोंबिवली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं जाहीर अभिनंदन... महाराष्ट्राच्या नकाशाचे तुकडे करु नका, हे श्रीपाल सबनीसांचं वाक्य महत्त्वाचं


- हिंमत असेल तर केलेल्या कामावर बोल आणि आमचे दावे खोडून दाखव, पुन्हा एकदा आव्हान देतो


- संयुक्त महाराष्ट्राला मतदान करणार की महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना मतदान करणार, उद्धव यांचा मुंबईकरांना सवाल


- शिवस्मारक आणि आंबेडकरांच्या स्मारकाचे वर्क ऑर्डर आणि टेंडर नाही मात्र पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन केलं. हे कायद्यात बसतं का?


- मेट्रोचा आराखडा पूर्ण नाही, त्यात मार्ग, स्टेशन दाखवता मग गिरगावकारांना घर कुठे देणार हे नाकाश्यात का दाखवत नाही


- मेट्रोचं प्रेझेन्टेशन तिथल्या लोकांना दाखवा, त्यानं जे मान्य असेल तर मेट्रो होईल नाहीतर मेट्रोवर फुली


- विकास नको म्हणणारे आम्ही कर्मदरिद्री नाही, पण आमचे थडगे बांधून विकास करणार असाल तर तुमच्या बिल्डिंग उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही


- 23 तारखेला मला हा पूर्ण परिवार भगवा करून हवाय... त्यावर कुठलाही रंग नको.. डाग नकोय... शिवरायांचा भगवा हवा...


- ही प्रचाराची नाही, विजयाची सभा आहे.


- अमित शाह यांना सांगतो, तुम्ही तुमच्या संकटकाळी तुमच्या पाठिशी उभा राहणारा मित्र गमावलेला आहे


- ये फ्रेंडली मॅच नही है, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे