जास्त बोललो तर घसा बसेल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
भाजपच्या विजयी मेळाव्यात शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : भाजपच्या विजयी मेळाव्यात शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसेल असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला आहे. शनिवारच्या सभेत भाषण करत असताना मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता आणि त्यांनी पाणी प्यायलं होतं. आज मी पाणी पित असलो तरी निकालाच्या दिवशी सगळ्यांना पाणी पाजेन असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मेळाव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजपचा कालचा प्रकार हा कोकणातल्या दशावतारासारखा होता असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूलाच गुंड, खंडणीखोर बसतात ते आम्हाला कसे काय गुंड, खंडणीखोर म्हणू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.