मुंबई : सरकारं येतात आणि जातात, कोणाचंही सरकार आलं तरी सीमावासियांवर अन्याय सुरूच आहे. मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का, असा थेट प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मैदानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्यानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना मानवंदनाच देत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सीमावसियांसोबत शिवसेना काल ही होती आणि आज ही आहे. त्याचबरोबर सीमावासियांना न्याय दिल्या शिवाय शिवसेना शांत बसणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलय.


सीमाभागात कानडी भाषेच्या सक्तीवर उद्धव ठाकरे बरसले बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. हे अन्यायकारक आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना कागदी नकाशावर केवळ रेषा मारून आमच्या मराठी बांधवांना महाराष्ट्रापासून तोडण्यात आले होते. कोणतेही सरकार आले, तरी हा सीमाप्रश्न सोडवला गेला नाही. उलट तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार वाढले, असे ते म्हणालेत.