मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहात्मक टीका केली. आता भाइयों किंवा मित्रो म्हणायला भीती वाटते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाइयों किंवा मित्रो, असे म्हटले तर लोकं निघून जातात.. म्हणून मी देवी और सज्जनो म्हणतो. बिट्टूजी तुम्ही काय म्हणालात, हल्ली कोणाचं ऐकावं लागतं? चहा वाल्याचे ऐकावे लागतं असं म्हणालात ना? 


विकास तर हवाच पण तो करत असताना निसर्ग सांभाळायला हवा. मेट्रो कारशेडच्याबाबतीत पण हेच आहे. त्यासाठी झाडांची तोड होणार आहे. आम्ही पण टायगर आहोत, उद्धव यावेळी म्हणालते.


आम्ही इथे (मुंबईत राणीच्या बागेत) पेंग्विन दाखवायला नको का, जी मुलं तिथे जाऊन पाहू शकत नाहीत त्यांना इथे दाखवण्यात काही चूक आहे का? ज्यांना याबाबत अर्धी माहिती आहे ते यावर बोलतात आणि राजकारण करत आहेत. झाडे लावा किमान असलेली झाडं तोडू नका, असा सल्ला उद्धव यांनी यावेळी दिला.