मुंबई : विलेपार्लेमध्ये होणारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आजची सभा रद्द करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रत्नागिरीतल्या खानू गावाजवळ झालेल्या अपघातात विलेपार्ल्यातले सात तरूण मृत्यूमुखी पडले.  त्यांच्यावर आज पार्ल्यातच अंत्यसंस्कार झाले. 


हे सर्व जण शिवसेनेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं पक्षानं स्पष्ट केलंय. मात्र अंधेरी येथील सभा वेळेनुसार होणार आहे. 


मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सभांचा धडाकाच लावलाय. सर्वच पक्षांकडून मुंबईत सातत्याने सभा घेतल्या जात आहेत.