मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात पक्षाचे सर्व नगरसेवक, नेते आणि प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने नगरसेवकांची मते उद्धव ठाकरे जाणून घेणार आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपमध्ये अत्यंत चुरस आहे. 


भाजपकडे 82 नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ आहे. तर बंडखोर आणि अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 87 पर्यंत पोचले आहे. तसेच सत्ता स्थापनेच्या शिवसेना-भाजपच्या चुरशीच्या घडामोडींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एमआयएम आणि समाजवादी पार्टी हे राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेतात याला महत्व असणार आहे.