मुंबई : पुढच्या दोन दिवसांत राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात उन्हाचा पारा सरासरी इतकाच राहील. मात्र विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअसवर राहील. 


मान्सूनचं अंदमानात आगमन झालेलं असून पुढील ४८ तासात तो पुढं सरकणार असल्याचा अंदाज आहे. सर्वसाधारण भारतात मान्सून ३१ मे दरम्यान येतो, अंदमान येथे मान्सून नियोजित तारखेच्या. दोन तीन दिवस आधीच आल्यानं त्याचा प्रवास आधीच्या गतीने होतो का याकडे लक्ष लागलंय.