व्हिडिओ : `कस्टम ड्युटी`च्या नावाखाली असा चालतो भ्रष्टाचार
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल - २ वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजतोय. `कस्टम ड्युटी`च्या नावाखाली इथले अधिकारी सामान्यांकडून कसे पैसे उकळतात, याचंचं हे आणखी एक उदाहरण आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल - २ वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजतोय. 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली इथले अधिकारी सामान्यांकडून कसे पैसे उकळतात, याचंचं हे आणखी एक उदाहरण आहे.
चॉकलेटवर कस्टम ड्युटी
मेघराज सोनावणे या मूळच्या महाराष्ट्रीयन तरुणानं फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केलाय. लंडनमध्ये बिझनेसमन असलेल्या या तरुणाकडे मुंबई विमानतळावर उतरला असताना फ्रान्सवरून आणलेली काही चॉकलेट सोबत आणली होती.
या चॉकलेटवर कस्टम ड्युटी असल्याचं सांगत झंझटातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांनी या तरुणाकडून ४००० रुपये उकळले. हा सगळा प्रकार मेघराजनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा भांडाफोड झालाय.
अनेकांचा हाच अनुभव...
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय. ९ मे रोजी मेघराजनं हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय. त्यावर अनेक उलट - सुलट चर्चाही झालेल्या पाहायला मिळाल्या. परंतु, अधिकाऱ्यांचा हा भ्रष्टाचार आपणही अनुभवल्याचं अनेकांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ९,१४८ जणांनी शेअर केलाय तर २ लाख ६ हजारहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केलंय.