मुंबई : मी देश सोडलेला नाही, बिझनेससाठी परदेशात जावे लागते, अशी माहिती खूद्द उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन दिलेय. त्यामुळे मल्ल्या देश सोडून गेल्याबाबत संभ्रम अधिक वाढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी पळालो नाही, कामासाठी परदेशात आलोय. आपण देशातून व्यावसायिक कामासाठी परदेशात आलो आहे, असे मल्ल्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.


एक खासदार म्हणून मी देशातील कायद्यांचा आदर आणि पालनही करतो. त्यामुळे कुठल्याही 'मीडिया ट्रायल'ची येथे गरज नाही, अशा शब्दांत मल्ल्या यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मीडियावर निशाणा साधलाय.


'मी आपणावर वर्षानुवर्षे केलेले उपकार, दिलेली मदत विसरू नका. मी ज्या सुविधा तुम्हाला पुरवल्या आहेत त्याचा संपूर्ण लेखाजोखा माझ्याकडे आहे. त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी जो खोटारडेपणा करत आहात तो थांबवा', असा इशाराही मल्ल्या यांनी मीडियाला दिलाय.  


मल्ल्या देश सोडून गेल्याच्या कारणावरून लोकसभेत काँग्रेसने मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस विरोधकांनी सभात्याग केला. पंतप्रदान नरेंद्र मोदी मल्ल्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल गांधीनी केला होता.