मुंबई : कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिस विलास  शिंदे यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच ते राहात असलेल्या वरळी पोलीस वसाहतीवर दुःखाची छाया पसरलीये... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलास शिंदे यांनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अडविले. त्यावेळी या मुलांने त्यांना लाकडी दांड्यांने बेदम मारहाण केली होती.


खारमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर मुंबईच्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. पेट्रोलपंपांवर उभे राहून वाहनांची माहिती घेतांना शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती.


नागरिकांना सुरक्षा पुरवणाऱ्या आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केलीये. 


शिंदेंवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा पोलिस-पत्नींनी व्यक्त केलीये... पोलीसाचा धाक राहील यासाठी अधिक कडक कायदे केले जावेत, अशीही त्यांची मागणी आहे... वरळी पोलीस वसाहतीतल्या नागरिकांशी चर्चा केलीये