मुंबई : चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये बुधवारी रात्री दोन प्रवासी ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास हा प्रकार घडला.. मंगळवारी डहाणूमधील प्रवासी ग्रुपने विरारमधील प्रवाशांना विरारमध्ये उतरु न देता वैतरणा रेल्वे स्थानकात उतरवले होते. हाच वाद बुधवारी पुन्हा एकदा उफाळून आला.


यावेळी विरार प्रवाशी डहाणू लोकल मधून प्रवास करीत असल्याचा रागाचं पर्यवसन हाणामारीत झालं. दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली.


यावेळी विरार रेल्वे स्थानकात आरपीएफने लाठीचार्ज करुन 13 प्रवाशांना ताब्यात घेतलं. या प्रवाशांची जामीनावर सुटका करण्यात आलीय.