मुंबई : पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक सतिश माथूर यांना व्हॉटस अॅपवर संदेश पाठवला होता. यावरून विठ्ठल जाधव यांना कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक सतिश माथूर यांना, 'व्हॉट्स अप' वर संदेश  पाठवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावर विठ्ठल जाधव यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र यावरून पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.


कथित व्हॉटस अॅपवर पाठवलेल्या संदेशात विठ्ठल जाधव यांनी म्हटलंय, 'मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो आहे, तसेच माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल', असा खळबळजनक संदेश लिहिला असल्याचं सांगितलं जात आहे.