मुंबई पालिकेत कचरा भ्रष्टाचार, पोकळ चौकशीचे आश्वासन
महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.
मुंबई : महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.
मुंबई महापालिकेतील अधिकारी मात्र याला अपवाद आहेत. कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फेऱ्या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला.
८ डिसेंबरच्या स्थायी समितीतही हा मुद्दा चर्चेला आला होता. तेव्हा पालिका प्रशासनाने याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु चौकशी तर दूरच राहिली. उलट अद्यापही त्याच जोमाने हा गैरकारभार मागील पानावरून पुढे सुरू आहे असल्याच झी 24 तासच्या तपासात पुढे आले आहे.