टँकरचे पैसे देणार, पण फळबागा टिकवा
दुष्काळामुळे राज्यात फळबागा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, दुष्काळात सर्वात मोठा फटका हा फळबागांना बसतो, अनेक वर्ष जगवलेली झाडं पाण्याअभावी वाळतात. यावर उपाय म्हणून, फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबई : दुष्काळामुळे राज्यात फळबागा टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, दुष्काळात सर्वात मोठा फटका हा फळबागांना बसतो, अनेक वर्ष जगवलेली झाडं पाण्याअभावी वाळतात. यावर उपाय म्हणून, फळबागा टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचाही खर्च देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
दुष्काळामुळे फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या या बागायतदारांना नव्याने फलोत्पादन करण्यासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असं देखील घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
मराठवाड्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना खडसे बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी शाश्वत विकासाच्या योजनांवर भर देण्याची आवश्यकता आहे.