इतकी वर्षं आपण गप्प का बसलो : अभिनेत्री ईशा कोप्पीकर
देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षं झाली, पण मुली मासिकपाळीमुळे काही ठराविक दिवस शाळेत जात नाहीत. इतक्या गंभीर विषयावर आजवर आपण गप्प का बसलो, हेच मला कळत नाही, असे उद्गार सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने काढले.
मुंबई : देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षं झाली, पण मुली मासिकपाळीमुळे काही ठराविक दिवस शाळेत जात नाहीत. इतक्या गंभीर विषयावर आजवर आपण गप्प का बसलो, हेच मला कळत नाही, असे उद्गार सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने काढले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन बसविले. याचे उद्घाटन तिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी हे उद्गार काढले. त्यावेळी सांगितले, दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन बसवण्यासाठी महिला आणि पुरुष एकत्र येऊन काम करताहेत, हे खरेच गौरवास्पद आहे. मनसेच्या या उपक्रमामुळे मला स्वत:ला या विषयाचे गांभीर्य उमगले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवारी मनसेचे चारकोप विभागअध्यक्ष दिनेश साळवी यांच्या पुढाकाराने स्वामी विवेकानंद शाळेत तर उपविभाग अध्यक्षा धनश्री नाईक व शाखा अध्यक्षा रेखा परमार यांच्या पुढाकाराने गोरेगाव येथील संस्कारधाम मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन बसवण्यात आल्या.
यावेळी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे म्हणाल्या, महिलांच्या अनेक विषयांकडे सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच गेल्या जागतिक महिला दिनी आम्ही महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठीची मोहीम सुरु केली, तर यंदा आम्ही महिलांसाठीच्या सर्व शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन बसवण्यासाठी जनजागृती करत आहोत.