मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, "सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांकडून वर्गाकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. व्यासपीठाला आग लागली तेव्हा कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री उपस्थित होते.


सगळे कलावंत, नागरिक सुखरुप आहेत. लाकडे आणि व्यासपीठावरील पडद्यांनी आगीचे स्वरुप वाढले. एसओपीमध्ये काही उणीवा होत्या का? हे देखील तपासले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


आगीचे कारण लगेचच सांगता येणार नाही. घटनास्थळी चार आगीचे बंब तैनात होते. आग लागल्यानंतर सोळा गाड्या दाखल झाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले. 


सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठाच्या समोरच्या भागात पहिल्यांदा आग लागली. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. चार दिवसांपूर्वी या ठिकाणाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. आपत्तीकालीन व्यवस्थापन आराखडा आम्ही तयार ठेवलेला होता.