मुंबई : तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या अबकारी विभागाच्या सर्व अधीक्षकांना यंदा तात्पुरते परवाने देऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे हाऊसिंग सोसायट्या, बँक्वेट हॉल आणि ओपन लॉनमधील दारुसह थर्टी फर्स्ट पार्ट्या करण्याचे प्लान फिस्कटणार आहेत. 


नोटाबंदीच्या निर्णयामुळे अबकारी विभागाला 4.88 टक्के महसूलाचं नुकसान झालंय. आता नव्या निर्णयामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 35 कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.