मुंबई : लोकलमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललीय. या गर्दीबाबत उच्च न्यायालयानं एक निरिक्षण नोंदवलंय. मुंबईतल्या लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीवर निरिक्षण नोंदवताना उच्च न्यायालयानं एक वेगळाच मुद्दा मांडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नाला नकार देतात, असा मुद्दा न्यायालयानं नोंदवलाय. हा मुद्दा मांडतानाच वेर्स्टनच्या विरार लोकलमधल्या वाढत्या गर्दीवरही न्यायालयानं चिंता व्यक्त केलीय.


आरटीआय कार्यरर्ते समीर झवेरी आणि इतर जनहित याचिकांवर न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठानं निरिक्षण नोंदवलंय. 


वेर्स्टनच्या मुली सेंट्रलला जायला नकार देतात असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. विरार लोकलच्या वाढत्या गर्दीवर सर्क्युलर टाईमटेबलची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली.