चोरीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
पश्चिम रेल्वेची वाहतूक पावसामुळे नाही, ओव्हर हेड वायरमुळे नाही, तर बॅटरी बॉक्सची चोरी झाल्याने ठप्प झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक पावसामुळे नाही, ओव्हर हेड वायरमुळे नाही, तर बॅटरी बॉक्सची चोरी झाल्याने ठप्प झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
माहिमला बॅटरी बॉक्स चोरी झाल्याने, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे, माहिमच्या सब स्टेशनजवळून हा बॅटरी बॉक्स चोरी झाल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
पावसामुळे अथवा वायरीत कोणताही बिघाड नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरूवातीला बिघाड कशात झाला आहे, हे स्पष्ट होत नसल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती.
मात्र आता बॅटरी बसवण्याची तयारी होत असल्याने ही वाहतूक पूर्ववत सुरू होईल असा दावा पश्चिम रेल्वेचा आहे.