गिरगाव चौपाटीच्या आगीचे कारण काय?
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेल्या आगीच्या कारणांचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत.
मुंबई : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेल्या आगीच्या कारणांचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र सरकारने आगी संदर्भात असलेले सूचना आणि मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष केले आणि हजारो लोकांच्या जीवा धोक्यात टाकले.
अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग ही कार्यक्रमात लावलेल्या फटाक्यामुळे लागली. फायर स्टेशन ऑफीसर ए. भोर हे घटनास्थळी उपस्थित होते. कनिष्ठ विभागीय अग्निशमन अधिकारी कार्ल डीसुझा यांनी संयोजकाना शनिवारीच पत्र पाठवून सांगितले होते की, घटना स्थळी कोणतेही फटाके फोडायचे नाही. पण हा पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि घटनास्थळी फटाके फोडण्यात आले.
भोर यांनी आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले.
काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली. तर अतिरिक्त सचिव के.पी. बक्षी यांनी सांगितले की, प्रेशर सिलेंडरमुळे फटाक्यांना आग लागली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, "सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल.
मेक इन कार्यक्रमातील आगीची घटना दुर्देवी - मुख्यमंत्री
याप्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांकडून वर्गाकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. व्यासपीठाला आग लागली तेव्हा कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री उपस्थित होते.
सगळे कलावंत, नागरिक सुखरुप आहेत. लाकडे आणि व्यासपीठावरील पडद्यांनी आगीचे स्वरुप वाढले. एसओपीमध्ये काही उणीवा होत्या का? हे देखील तपासले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आगीचे कारण लगेचच सांगता येणार नाही. घटनास्थळी चार आगीचे बंब तैनात होते. आग लागल्यानंतर सोळा गाड्या दाखल झाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठाच्या समोरच्या भागात पहिल्यांदा आग लागली. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. चार दिवसांपूर्वी या ठिकाणाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. आपत्तीकालीन व्यवस्थापन आराखडा आम्ही तयार ठेवलेला होता.