मुंबई : आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदयाला असेल त्यादिवशी नरकचतुर्दशी असते. आज नरकचतुर्दशी आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान केलं जातं. यामागचं कारण काय आहे हे अनेकांना कल्पना नसावी.


थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेला सुरकुत्या पडत असतात. तसच थंडीत त्वचा कोरडी पडते. आणि म्हणूनच  यावर उत्तम उपाय म्हणून अभ्यंगस्नान केलं जातं. शरीराला सुगंधी उटणं आणि तेल लाऊन मसाज केल्यानंतर गरम पाण्याने स्नान करणं यालाच 'अभ्यंगस्नान' म्हणतात. अभ्यंगस्नान केल्यानं स्नायू बळकट होतात आणि त्वचा तेजस्वी होते. नरकचतुर्दशी संबंधी एक पौराणिक कथाही आहे.