अशी होईल मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता ताणवली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार यावर चर्चा होत आहे. पण नेहमी ही प्रक्रिया कशी होणार जाणून घ्या...
मुंबई : मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता ताणवली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार यावर चर्चा होत आहे. पण नेहमी ही प्रक्रिया कशी होणार जाणून घ्या...
१) सर्व नविन नगरसेवकांच्या उपस्थितीत पालिका सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी म्हणजेच महापौर स्नेहल आंबेकर या महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांची नावे वाचून दाखवतील.
२) त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५-२० मिनिटे वेळ दिला जाईल. मग महापौर पदाच्या शर्यतीतील उमेदवारांची क्रमानुसार नावे पुकारली जातील.
३) नाव पुकारल्यानंतर त्याला मत देण्यासाठी समर्थक नगरसेवकांना हात वर करावे लागतील. त्याच बरोबर प्रत्येक समर्थक नगरसेवकाला कुणाला पाठिंबा आहे, हे विचारून त्याला उमेदवाराच्या नावापुढे सही करावी लागेल.
४) जर चुकून किंवा जाणूबुजून एखाद्या नगरसेवकांने हात एकासाठी वर केला आणि सही मात्र दुस-याच उमेदवारापुढं केली, तर ते मत बाद ठरवले जाईल.
५) या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग केले जाईल. अशा प्रकारे सर्व उमेदवारांची नावे पुकारून त्याला असलेल्या समर्थक नगरसेवकांची संख्या मोजली जाईल.
६) इथं विधानसभेप्रमाणे सत्तेसाठी मॅजिक फिगर गाठण्याची गरज नसल्यानं सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार महापौर म्हणून घोषित केला जाईल. यानंतर सध्याचे महापौर नव्या महापौरांच्या हाती सूत्रे सोपवतील.