`राणे भाजपनंतर कोणत्या पक्षात जाणार?`
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवरून शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नारायण राणेंना चिमटा काढला आहे.
शिवसेना झाली मग काँग्रेस आणि आता राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. राणे भाजपनंतर कुठे जाणार हेही सांगावं. भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलाय. राणे राष्ट्रवादीमध्ये कधी जाणार हे सांगा, असं कदम म्हणालेत.