कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत.
मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर डंकन फ्लेचर यांचा प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात आला. त्यानंतर रवी शास्त्री यांना संघ संचालक म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले.
सध्या भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यावर असून या मालिकेसाठी संजय बांगर यांना हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतात झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्री यांचा करारही संपुष्टात आला.