मुंबई :  ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवार एका रात्रीत स्टार झाला. यानंतर विविध चॅनलमध्ये सनीच्या मुलाखती झाल्या, पण त्याने त्या हिंदीतून दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी पवारने झी २४ तासच्या स्टुडिओमध्ये भेट दिली. त्यानंतर तो हिंदीतून का बोलतो याचे गुपीत त्याने आणि त्याच्या वडिलांनी उघड केले. 


सनी पवार हा कलीना येथे राहायला आहे. तो सोलापूरच्या कैकाडी समाजातील आहे. त्याच्या घरात कैकाडी समाजाची भाषा बोलतात. तो इंग्रजी शाळेत शिकतो, तसेच त्याच्या आसपास राहणारी मंडळी हिंदीतून बोलते. त्याच्या हिंदीबद्दल त्याची आई म्हणाली, घरात आमची बोली भाषा बोलली जाते, पण तो छोटा भीम पाहतो, त्यामुळे त्याची हिंदी खूप चांगली झाली आहे.  त्यामुळे तो बहुतांशी हिंदीतून बोलतो.