एक जुलैनंतर आधार कार्डशिवाय होणार नाहीत ही सरकारी कामे
तुमच्याकडे आधारकार्ड आहे ना? नसेल तर आजच काढून घ्या. कारण एक जुलैपासून अनेक सरकारी कामांसाठी तुम्हाला आधारकार्डची गरज पडणार आहे.
मुंबई : तुमच्याकडे आधारकार्ड आहे ना? नसेल तर आजच काढून घ्या. कारण एक जुलैपासून अनेक सरकारी कामांसाठी तुम्हाला आधारकार्डची गरज पडणार आहे.
केंद्र सरकारकडून एक जुलैनंतर पासपोर्ट बनवायचा असल्यास 12 डिजीट आधारनंबर असणे अनिवार्य होणार आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधारकार्ड गरजेचे होणार आहे.
पॅनकार्ड बनवण्यासाठीही आधारकार्डची गरज लागणैार आहे. जर तुमच्याकडे आधारकार्ड नाही तर 1 जुलैनंतर तुम्ही पॅनकार्ड बनवू शकणार नाहीत.
रेल्वे तिकीटांसाठीही आधारकार्ड गरजेचे आहे. तिकीट बुक करताना आधारनंबर देणे गरजेचे असेल. घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी कनेक्शनसाठीही आधारनंबर गरजेचा आहे.