रेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.
मुंबई : लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.
सितारानी गंगाप्रसाद फतवा असे या महिलेचे नाव आहे. सितारानी ४५ वर्षांच्या होत्या, दिवा येथे रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर महिलेचे कुटुंब घटनास्थळी पोचले. तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
या महिलेकडे कपड्यांचे गाठोडे आणि पाण्याची बादली सापडल्याने ती कपडे धुण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून गेली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.