कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं होतंय सर्वत्र कौतुक
`सदरक्षणाय खलनिग्रहणाय` हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.
मुंबई : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.
पोलिसाच्या प्रामाणिकपणाचं आणखी एक उदाहरण घाटकोपरमध्ये समोर आलंय. घाटकोपर पोलीस ठाण्यात पोलीस लता नाईक या ऑन ड्युटी असताना त्यांना एक सोन्याची अंगठी सापडली.
ही मौल्यवान अंगठी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांना दिली. लता नाईक यांच्या प्रामाणिकपणांचं कौतुक करत अंगठीची नोंद बोर्डवर करण्यास सांगितलं.
त्याचवेळी एक व्यक्ती ही अंगठी शोधत असल्याचं पोलीस शिपायाच्या निदर्शनास आलं. त्यानं त्याला पोलीस ठाण्यात जाऊन अंगठी घेण्यास सांगितलं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या इसमाची पूर्ण खातरजमा करुन हरवलेली अंगठी त्याच्या स्वाधीन केली.या प्रामाणिकपणाबद्दल महिला पोलीस लता नाईक यांचा विशेष गौरव करण्यात आलाय..