मुंबई : आजपर्यंत ग्रामीण भागात महिला गरोदर असतांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच डिलीवरी झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा एकल्या असतील. पण शहरासारख्या ठिकाणी या घटना तुम्हाला अधिक पाहायला मिळत नाही. १०८ या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपात्कालीन घटनेवेळी अॅम्बुलन्स बोलावण्यात येते. असंच काही आज मुंबईत घडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात मोठी रुग्णालय असणाऱ्या मुंबई शहरात आज रस्त्यातच म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वीच अॅम्बुलन्समध्ये डिलीवरी झाल्याची घटना घडली आहे.


चर्णीरोड रेल्वे स्थानकावर एका २१ वर्षीय गरोदर महिलेच्या पोटात अचानक कळा सुरु झाल्याने जवळपास साडेसहा वाजेच्या सुमारास १०८ क्रमांकावर फोन करुन अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. डॉक्टर तेथे पोहोचले आणि महिलेला रुग्णालयात घेऊन जात असतांनाच महिलेने एका मुलीला अॅम्बुलन्समध्ये जन्म दिला.


महिला आणि मुलीची प्रकृती चांगली असून त्यांना कामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.