COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आज जागतिक जल दिवस, आज पाण्याची भीषण कमतरता अनेक ठिकाणी जाणवते, जलसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय देखील हा महत्वाचा मुद्दा आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीवरही मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम झाला आहे.


आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात देखील एक एपिसोड पाणी या विषयावर घेण्यात आला होता. यात सुखविंदर सिंह यांनी जल ना जाए जल हे गाणं गायलं होतं, या दिवशी आपण हे गाणं ऐकून पाणी वाचवण्याचा संकल्प करू या.