मुंबई : महापौर निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचे नगरसेवक व सभागृह नेते यशवंत जाधव यांचे पाकीट आणि मोबाइल चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका मुख्यालय ते हुतात्मा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत यशवंत जाधव यांचे पाकीट आणि २५ हजार रुपयांचा मोबाइल चोरीस गेला. 


पाकीटात १२ हजार रुपये रोख, निवडणूक ओळखपत्र, मागील दोन नगरसेवकपदाचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड होते अशी माहिती जाधव यांच्या निकटवर्तियांनी दिलीय. मात्र, जाधव यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.