ट्रेनमधली मस्ती बेतली जीवावर
मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये.
मुंबई: मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये. भरधाव ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवरच्या व्यक्तीला टपली मारण्याच्या नादात समोरच्या खांबावर आपटून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.
गोरेगाव स्टेशनवर शनिवारी दुपारी ही घटना घडली. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झालीत. अनेक तरुण धावत्या ट्रेनमध्ये अशी मस्करी करतात. यात अनेकांचा जीव गेलाय. अशा मस्तिखोर तरुणांसाठी हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं आहे.
रेल्वे प्रशासनाकडून अशा तरुणांना वारंवार सूचना केल्या जातात मात्र तरीही टवाळखोरांना त्याच्याशी देणंघेणं नाही हेच या दुर्घटनेवरुन दिसून येतंय.