मुंबई : फुटबॉलमध्ये लिओनल मेस्सी आणि रोनाल्डोचे यांच्यात चांगला फुटबॉलपटू कोण आहे? हा प्रश्न कोणच्या हत्येस कारणीभूत ठरु शकतो का? मात्र खरंच असं मुंबईत घडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेस्सी आणि रोनाल्डोच्या प्रश्नावरुन झालेल्या वादात २१ वर्षीय नायजेरियाच्या मायकेल चुकवूमाने आपल्या देशाच्या ओबिना दुरुमचुकवूची चाकूने हत्या केली. 


शनिवारी रात्री एका पार्टीनंतर ही घटना घडली. ते दोघेही फुटबॉलपटूंबाबत चर्चा करत होते. दोघांपैकी एक मेस्सीचा चाहता तर दुसरा रोनाल्डोचा फॅन होता. त्यांची सुरु असलेली चर्चा हळूहळू वादात रुपांतरित झाली. त्यानंतर तर चक्क या दोघांनी मारामारी सुरु केली. या मारामारीत एकाचा मृत्यू झाला.