मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूनंतर काँग्रेस, मनसे यांनी शिवसेनेवर विशेषतः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


फोटो मागचं सत्य....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम दर्शनी हा फोटो पाहिल्यावर राणीच्या बागेत युवराज नावाच्या वाघाने साडे तीन कोटी रुपयांचे पेंग्विन ठार मारल्याचे दिसते. या फोटोवर लिहीले आहे की 'राणीच्या बागेत युवराज नावाच्या वाघाने, साडे तीन कोटी रुपयांचे पेंग्विन मारले. पण हा फोटो खरा नाही आहे. हो फोटो इंटरनेटवरून काढून त्यावर फोटोशॉपने काम केले आहे. 


का केला व्हायरल. 


आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे पेंग्विनचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. त्याचाच उपहास करण्यासाठी या फोटोचा वापर केला आहे. 


या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेची प्रतिमा सोशल मीडियावर मलीन करण्याचा प्रयत्न केला जात  आहे. 


 


नितेश राणेंचा आरोप 


या पूर्वी राणीच्या बागेतल्या पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. बालहट्टामुळे या पेंग्विनचा मृत्यू झाल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.


नेमकं काय झालं पेंग्विनला


मुंबईतील जिजामाता प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत 4 नर आणि 4 मादी पेंग्विन आणले होते. यातल्या कोरियातून आणलेल्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. यकृतात संसर्ग झाल्यामुळे, या मादी पेंग्विनवर उपचार सुरु होते.


काय होतं आदित्य ठाकरेंचे स्वप्न


दरम्यान इतर 3 नर आणि 4 मादी पेंग्विन निरोगी असल्याचं सांगण्यात आलंय. थंड हवामानात आढळणारे पेंग्विन मुंबईत आणणं हे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं स्वप्न होतं. पेंग्विनना मुंबईतलं वातावरण मानवेल का, यावर त्यावेळी बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.