मुंबई : पवई तलावात यापुढे एकही हाऊसबोट चालणार नाही. शुक्रवारी रात्री पवईतल्या तलावात हाऊसबोट बुडाली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनानं यापुढे पवई तलावात हाऊसबोट चालणार नाही, असा इशारा दिलाय. शुक्रवारच्या दुर्घटनेला कारणीभूत हाऊसबोट मालकांना लवकरच कारणे दाखवा नोटीस नोटीस बजावण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यानं ही नोटीस बजावली जाणार आहे.


विशेष म्हणजे, पवई तलावात हाऊस बोट अनधिकृतरित्या चालवल्या जात असल्याची तक्रार याआधीच स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती. मात्र, बड्या लोकांच्या या हाऊसबोट पार्टीला नेहमीच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिशी घातलं होतं. परिणामी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या हाऊसबोट पार्टीत ही दुर्घटना घडल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.


'झी 24 तास'नं 2 डिसेंबर 2014 रोजीच या अवैध हाऊस बोटिंगचा पर्दाफाश केला होता. मात्र, तरीही चोरून इथे अलिकडच्या काळात हाऊस बोटींग सुरुच होती.