मुंबई : संयुक्त राष्ट्र संघांच्या मंचावरून नवाज शरीफ यांनी भारतावर केलेल्या आरोपांनंतर झी समूह जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरिफांचं युनोतील वक्तव्य दुर्दैवी असल्याचं एस्सेल समुहाचे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा यांनी म्हटलंय. त्यामुळे आम्ही जिंदगी या चॅनलवरील पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याच्या विचारात आहोत अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष चंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीये. 


पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानात परत जायला हवं असंही ते म्हणालेत. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मैत्रीचं नातं अधिक घट्ट व्हावं या हेतूनं झी समूहाने 23 जून 2014मध्ये जिंदगी हे चॅनल सुरु केलं. या चॅनलच्या माध्यमातून पाकिस्तानसह बांग्लादेश, इराण, थायलंड अशा विविध देशांतील उत्तम मालिका भारतात दाखवण्यात येत आहेत.


भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांतील संबंध सुधारावेत या हेतूनं ही संकल्पना आमलात आणली मात्र पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले आणि युनोमध्ये शरिफांनी भारतावर केलेले आरोप यामळे एस्सेल समुहानं पाकिस्तानी चॅनल बंद करण्याचा विचार केलाय.