मुंबईत बेकार झिंगाट डान्स, गणपती आणताना बसवर चढलेत असे `सैराट` तरुण
मुंबईत गणपती आणताना तरुणांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. काहींनी अतिरेक करत चक्क बसवर चढण्याचा आततायीपणा केला.
मुंबई : 'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याने तरुणांना वेड लावले. राज्यात अनेक ठिकाणी आजही झिंगाट या गाण्याची नशा काही उतरलेली दिसत नाही. मुंबईत गणपती आणताना तरुणांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. काहींनी अतिरेक करत चक्क बसवर चढण्याचा आततायीपणा केला. हे तरुण एवढ्यावर न थांबता बसवरही डान्स करत होते.
रस्त्यावर तरुणांचा मोठा मॉब बेभान होऊन नाचत होता. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र, या तरुणांनी अनेक बस अडवून धरल्यात. एकामागोमाग अनेक बस खोळंबल्यात. तसेच वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला. असे असताना झिंगाट झालेले तरुण बसवरच चढलेत, हे कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ :