मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरचा वाघ सध्या महाराष्ट्राच्या जंगलात हिंडतोय. जंगलाच्या वाघाच्या सोबत तो सध्या काही सुखाचे क्षण घालवतोय. नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हांडला या अभयारण्यात तो सध्या फिरतो आहे. महाराष्ट्र सरकारने सचिनला व्याघ्रदूत होण्याचे निमंत्रण दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनला खरं तर या त्याच्या भेटीबद्दल कमालीची गुप्तता बाळगायची होती. पण, सचिनने तिथल्या स्थानिकांसोबत एक फोटो काढला होता. तो फोटो व्हायरल झाला. आता जंगलातला एक सेल्फी आता स्वतः सचिननेच फेसबूक आणि ट्विटरवर शेअर केला आहे. 'मी निसर्गदेवतेच्या सानिध्यात आहे. निसर्गाचा आणि जंगलाचा अनुभव घेतोय. ओळखा आता मी कुठे आहे? (क्लू - मी महाराष्ट्रातच आहे)' असा मॅसेजही त्याने टाकला आहे.