पुणे: राज्यभरामध्ये हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर, पुण्यामध्ये राजकीय पक्षांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. हेल्मेट सक्तीच्या या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेल्मेट सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनीही टीका केली आहे.  हेल्मेट सक्ती नागरिकांच्या हितासाठी आहे का हेल्मेट उत्पादकांच्या फायद्यासाठी असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हेल्मेट वापरणं योग्य आहे, पण त्यासाठी सक्ती नको, हेल्मेट सक्तीमागे नागरिकांची काळजी आहे का हेल्मेट उत्पादकांची अशी शंका त्यांनी उपस्थित केली.


हेल्मेट सक्ती करण्याआधी रस्ते नीट करण्याची सक्ती का नाही, नागरिक खड्ड्यात पडणार नाहीत याची काळजी घ्या असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. पुण्यातल्या कसबा विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलं, त्यावेळी त्यांनी हेल्मेट सक्तीच्या राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.