पुणे : लगे रहो मुन्नाभाईमध्ये संजय दत्तनं केलेली रेडिओ जॉकीची भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिली. अटकेमध्ये असलेला संजय दत्त सध्या खऱ्या आयुष्यातही रेडियो जॉकी झाला आहे. येरवडा तुरुंगामध्ये संजय दत्तचा 'आप की फरमाइश' हा शो लोकप्रिय झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येरवडा तुरुंगात असलेल्या 4 हजारांपेक्षा जास्त कैद्यांसाठी प्रशासनानं रेडिओ चॅनल सुरु केलं. या चॅनलच्या शो मध्ये संजय दत्त रेडिओ जॉकी आणि निर्माता अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. 


20 बाय 20 च्या खोलीमध्ये हे रेडिओ चॅनल चालवलं जात आहे. येरवडा जेलमधले कैदी आपली फर्माईश करतात, आणि संजय दत्त या फर्माइश पूर्ण करतो. 


वास्तवमधील 'पचास तोला', लगे रहो मुन्नाभाईमधील 'अपुन के पास बापू है' या डायलॉगची फर्माइश कैदी संजय दत्त पुढे सगळ्यात जास्त करतात. कैद्यांमध्ये हा शो एवढा लोकप्रिय झाला आहे, की सुट्टीच्या दिवशीही हा शो सुरु ठेवावा लागत आहे.