रिओ : रियो ऑलिंपिकमध्ये शुक्रवारी संध्याकाळी संर्पूर्ण देशाचं लक्ष हे टीव्हीवर असेल आणि आकर्षण असेल ते शटलर पी.व्ही सिंधू. बॅडमिंटन सिंगल्‍सच्या फायनलमध्ये सिंधूचा सामना वर्ल्‍ड नंबर वन स्‍पेनच्या कॅरोलिना मारिन सोबत होणार आहे. आज जर सिंधू जिंकली तर भारतीय ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोल्‍ड जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरेल. जाणून घ्या तिच्याबाबत आणखी काही गोष्टी


१. सिंधूचा जन्म ५ जुलै, १९९५ मध्ये हैदराबाद येथे झाला.


२. ८ वर्षाच्या वयातच तिने बॅटमिंटन खेळणं सुरु केलं.


३. पी. व्ही सिंधूचे पिता पी.व्ही रमन्ना आणि आई पी विजया  वॉलिबॉल खेळाडू होते.


४. पी व्ही सिंधूला १८ वर्षातच अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 


५. २०१५ मध्ये पद्म श्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आला.


६. ०१३ मध्ये ग्वांग्झू चीनमध्ये आयोजित वर्ल्ड बॅटमिंटन चॅपियनशिपमध्ये कास्य पदक जिंकल्यानंतर ती चर्चेत आली.


७.२०१३ मध्ये सिंधूने मलेशिया ओपन आणि मकाऊ ओपनचा ख़िताब जिंकला आणि २०१४ मध्ये देखील तिने कोपेनहागेनमध्ये हा कारनामा करुन दाखवला. 


८. पीव्ही सिंधूने आतापर्यंत ६ खिताब जिंकले आहे. पीव्ही सिंधूने आतापर्यंत जगातील सर्व मोठ्या खेळाडूंना पराजित केलं आहे.


९. रिओमध्ये देखील तिने तिच्यापेक्षा चांगल्या रँकिंगवाल्या खेळाडूंचा पराभव करत फायनलमध्ये जागा बनवली आहे.


१०. पी.व्ही सिंधूला पहिल्यांदाच यंदा ऑलिंपिकमध्ये संधी मिळाली आहे.