पुणे : ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाला माहित होतं की भारत दौऱ्यात त्यांना स्पिनसाठी चांगल्या स्पिचचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पुण्याच्या क्यूरेटरने पिचमध्ये बाउंस असल्याचं म्हटल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने स्पिनर्सला खेळवलं.


कंगारुंनी यावेळेस स्पिनर्ससोबत चांगली तयारी केली. आणि त्यांना साथ दिली माजी भारतीय स्पिनर श्रीधरन श्रीराम आणि भारतीय वंशाचे इंग्लिश स्पिनर मोंटी पनेसर यांनी.


भारताला भारतातच जेव्हा इंग्लंड संघाने हरवलं तेव्हा माँटी पनेसरने म्हत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी आधी श्रीराम आणि मग माँटीची मदत घेतली.


भारताकडून ८ वनडे खेळणाऱ्या ४० वर्षीय श्रीराम यांनी २९ जानेवारीला स्पिन कंसल्टंट म्हणून दुबईला गेले. जेथे ऑस्ट्रेलिया टीमचे काही सदस्य होते जे प्रॅक्टीस करत होते. त्यांनी भारत दौऱ्यात येण्याआधीच अश्विन आणि जडेजा यांच्या बॉलिंगचा सामना कसा करायचा याबाबतच्या टीप्स ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिल्या.


श्रीलंका दौऱ्यातही ऑस्ट्रेलियाने श्रीराम यांच्याकडून टीप्स घेतल्या होत्या. या टेस्टमध्ये प्रॅक्टीसदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एका भारतीय बॉलरकडून स्पिनचा अभ्यास केला. ज्याची अॅक्शन अश्विन सारखीच होती. दौऱ्याआधी पनेसरने ब्रिसबेनमधील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये स्टीव ओकीफीला भारतीय पिचवर गोलंदाजी कशी करावी याबाबत टीप्स दिल्या होत्या.