मोहाली: टी 20 वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर शेन वॉटसन निवृत्त होणार आहे. त्याआधी त्यानं आपल्या कारकिर्दितली कडू आठवण शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 साली भारत दौऱ्यावर असताना माझं निलंबन झालं, माझ्या क्रिकेट कारकिर्दीमधली ही सगळ्यात वाईट गोष्ट होती. हैदराबाद टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, मिचेल जॉनसन आणि उस्मान ख्वाजा यांना होमवर्क न केल्यामुळे परत ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं होतं. 


निलंबनाची ही कारवाई मी मोहालीमध्ये असताना झाली होती. आम्ही चंदीगडच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेलच्या खोलीतील त्या कडू आठवणी मी कधीच विसरू शकत नाही, असं वॉटसन म्हणाला आहे. 


ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अनेक चांगले क्षणही आले, याबाबत मी भाग्यवान आहे, हे सांगायलाही वॉटसन विसरला नाही.