मुंबई : मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये रविवारी फायनल मॅच रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होणार आहे. 


आयपीएल फायनलमधल्या ५ गोष्टी :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न :


विराट कोहलीने सुरवातीलाच सांगितलं होतं की त्याचं आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न आहे. विराट पुढे डेविड वॉर्नर आणि त्याच्या हैदराबाद टीमचं आव्हान असणार आहे. 


2. पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची संधी :


सनराइजर्स हैदराबाद आणि बंगळुरु या दोन्ही संघांना आयपीएल चॅम्पियन होण्याची पहिली संधी आहे. बंगळुरु २ वेळा फायनलमध्ये पोहचली आहे पण त्यांना चॅम्पियन होता आलं नाही.


3. कोहलीचे १००० रन होणार पूर्ण : 


विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक ९१९ रन्स केले आहेत. १००० चा आकडा गाठण्यापासून विराट फक्त ८१ रन मागे आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटने ८ इनिंगपैकी ६ इनिंगमध्ये ५० हून अधिक रन केले आहेत. ३ अर्धशतक आणि ३ शतकीय खेळी त्याने या मैदानावर खेळली आहे. विराटने ४ शतक लगावले आहे. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर ५ शतक आहेत. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये ४०९८ रन्स केले आहे तर कोहली ४०५६ रन्ससह दूसऱ्या स्थानावर आहे.


4. दोन्ही टीमसमोरील चॅलेन्ज :


विराट आणि बंगळुरु टीम समोर सनराइजर्स हैदराबादच्या बॉलर्सचं मोठं आव्हान आहे. भुवनेश्वर कुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो २३ विकेटसह पर्पल कॅपच्या स्पर्धेत सगळ्यात पुढे आहे. तर हैदराबाद पुढे विराट आणि डिविलियर्सचं मोठं आव्हान असणार आहे.


5. पाऊस बिघडवणार खेळ :
आयपीएलच्या फायनलमध्ये पावसाचं सावट आहे. शनिवारी बंगळुरुमध्ये पाऊस पडला. पाऊस पडला तर काही ओव्हर्स कमी होऊ शकतात. मॅच नाहीच झाली तर सोमवारी फायनल होऊ शकते.