भारताच्या विजयाची ही आहेत ५ कारणे
आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.
मिरपूर : आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.
रोहित-युवराजची भागीदारी - रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी ७ षटकांत ५५ धावांची केलेली भागादारी भारताला मोठी धावसंख्या रचून देण्यात महत्त्वाची ठरली. सुरुवातीला भारताचा डाव अडखळला होता. मात्र या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले.
हार्दिक पांड्याची दमदार खेळी - ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या झटपट खेळीमुळे भारताने वेगाने धावसंख्या रचता आली. त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या.
नेहराची कमाल - भारताच्या विजयात आशिष नेहराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने चार षटकांत २३ धावांत तीन विकेट मिळवल्या.
रोहितचे १०वे अर्धशतक - भारताचा डाव अडचणीत आला असताना सलामीवीर रोहित शर्माने धमाकेदार ८३ धावांची खेळी करताना आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १०वे अर्धशतक साजरे केले. त्याने ५५ चेंडूत ७ चौकार आणि तीन षटकारांसह ८३ धावांची तुफान खेळी केली.
युवराजच्या १००० धावा पूर्ण - बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. युवीच्या ४७ सामन्यांत १००८ धावा झाल्यात.