मुंबई : टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 वी आणि 200 वी टेस्ट नाही ठरली 'खास'


भारतीय टीमला 100 व्या टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तर 200 वी टेस्ट ही ड्रॉ झाली होती. 1967 मध्ये टीम इंडियाने 100 वी टेस्ट मॅच खेळली होती. 100 मध्ये भारताने फक्त 10 टेस्ट जिंकल्या होत्या. भारताने इंग्लंड विरोधात ही 100 वी टेस्ट खेळली होती. 1982-83 मध्ये लाहोर येथे पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये 200 वी टेस्ट मॅच झाली होती. ही सिरीज भारताने 0-3 ने गमावली होती.


300व्या टेस्टमध्ये कुंबळे आणि श्रीनाथ ठरले होते 'हीरो'
1996 मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 300वी टेस्ट मॅच खेळली गेली होती. दक्षिण आफ्रिकेचा भारताने 64 रन्सने पराभव झाला होता. श्रीनाथ आणि स्पिनर अनिल कुंबळेने या मॅचमध्ये मोठी भूमिका निभावली होती. श्रीनाथने या मॅचमध्ये आठ तर कुंबळेने 5 विकेट घेतल्या होत्या. 


400व्या टेस्टमध्ये कुंबळेचा सिक्स पडला भारी
30 जूनला जमैकामध्ये भारत आणि वेस्टइंडिजमध्ये मॅच सुरु झाली. सबीना पार्कमधील या मॅचमध्ये कुंबळेने दुसऱ्या इनिंगमध्ये सिक्स लगावला जो वेस्ट इंडिजला भारी पडला. 4 पैकी 3 मॅच ड्रॉ ठरल्या होत्या तर चौथी मॅच भारताने जिंकली. हा विजय भारताने तब्बल 35 वर्षानंतर मिळवला होता. दुसऱ्या इंनिगमध्ये कुंबळेने 6 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला होता.


500 व्या टेस्टमध्ये कुंबळे ठरणार लकी
भारत आता 500वी टेस्ट मॅच खेळणार आहे. अनिल कुंबळे देखील कोचच्या रुपात या टीमचा एक भाग आहे. त्यामुळे कुंबळे पुन्हा भारतीय संघासाठी लकी ठरतो का हे पाहावं लागेल.