हरारे : लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने ४९.५ ओव्हरमध्ये १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने हे आव्हान ४२.३ ओव्हरमध्ये पूर्ण केले. या सामन्यात आठ रेकॉर्ड झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदार्पणातच शतक -  पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा लोकेश राहुल पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. यापूर्वी पदार्पणात रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ८६ धावा केल्या होत्या.


जलद १००० धावा -  अंबाती रायडूने २९व्या इनिंगमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. 


सलामीवीर पदार्पण - करुण आणि लोकेशआधी पर्थासर्थी शर्मा आणि दिलीप वेंगसरकर यांनी १९७६मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते.


४६ डॉट बॉल्स - झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पहिल्या १० ओव्हरमध्ये ४६ डॉट बॉल्स खेळले. 


३० ओव्हरमध्ये ९१ रन्स - टीम इंडियाने या सामन्यात पहिल्या ३० ओव्हरमध्ये केवळ ९१ रन्स बनवले. गेल्या १० वर्षातील भारताचा हा सगळ्यात खराब परफॉर्मन्स आहे. 


३ इनिंगमध्ये २१९ रन्स - झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मस्कजादाने याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गेल्या ३ इनिंगमध्ये २१९ धावा केल्या होत्या.