वनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप
वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दुबई : वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीनं जाहिर केलेल्या या क्रमावारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेली ५ वनडेची सीरिज दक्षिण आफ्रिकेनं ३-२नं जिंकली. या सीरिजमध्ये एबीनं २६२ रन केल्या. वेलिंग्टनमध्ये झालेल्या शेवटच्या वनडेमध्ये ८५ रनची खेळी केल्यामुळे एबीला पहिल्या क्रमांकावर झेप घेता आली.
आयसीसीच्या या क्रमवारीत टॉप १०मध्ये फक्त कोहली हाच एकमेव भारतीय आहे. या क्रमवारीमध्ये रोहित शर्मा १२, धोनी १३व्या आणि शिखर धवन १५व्या क्रमांकावर आहेत. बॉलरच्या यादीमध्ये भारताचा अक्सर पटेल ११व्या क्रमांकावर आहे.
वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थान गाठण्याची एबीची ही दहावी वेळ आहे. पहिल्यांदा मे २०१०मध्ये एबी पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. २००९नंतर एकदाही एबी डिव्हिलियर्स पहिल्या पाच बॅट्समनमध्ये कायम आहे.