नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम वोग्सने पहिल्याच डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना रेकॉर्ड मोडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या कसोटी सामन्यात वोग्सने नाबाद सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम केलाय. हा रेकॉर्ड यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावताना पहिल्या डावात नाबाद सर्वाधिक धावा त्याने बनवल्यात. वोग्सने नाबाद ५५१ धावा करताना सचिनलाही मागे टाकलेय. त्याने ( २६९, १०६, १७६ ) अशा धावा केल्या.


 


याआधी सचिनने २००४मध्ये नाबाद ४९७ (२४१, ६०, १९४,२) धावा केल्या होत्या. तसेच वोग्सने ऑस्ट्रेलियाचेच दिग्गज माजी क्रिकेकट डॉन ब्रॅडमन यांचाही रेकॉर्ड मोडलाय. ब्रॅडमन ९९.९४च्या सरासरीने फलंदाजी केलीय. तर सध्या कसोटी सामन्यात वोग्स १००.३३च्या सरासरीने फलंदाजी करतोय. वोग्सने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत १४ सामन्यात १२०४ धावा केल्यात. याच पाच शतकांचा समावेश आहे.